भाजप नेत्याची जीभ घसरली, राऊत याचं कार्ट तर प्रियंका गांधी यांचा बौद्धिक पात्रता नसलेल्या म्हणत केला उल्लेख
त्यांनी आमच्या कुटुंबाला देण्यात येणाऱ्या शिव्यांची यादी काढली, तर एकापाठोपाठ एक पुस्तकांचं प्रकाशन करावं लागेल. मी असे पहिले पंतप्रधान पाहिलेत की, जे लोकांसमोर येत रडत सांगतात की त्यांना शिव्या दिल्या जात आहेत.
मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत (Karnataka Assembly Elections) काँग्रेस आणि भाजपत आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी पहायला मिळत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी सभेत आपल्याला काँग्रेसने 91 वेळा शिव्या दिल्या. त्यावर ते रडले. त्यावरून काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी सडेतोड उत्तर देताना टीका केली. त्यांनी आमच्या कुटुंबाला देण्यात येणाऱ्या शिव्यांची यादी काढली, तर एकापाठोपाठ एक पुस्तकांचं प्रकाशन करावं लागेल. मी असे पहिले पंतप्रधान पाहिलेत की, जे लोकांसमोर येत रडत सांगतात की त्यांना शिव्या दिल्या जात आहेत. त्यांचा हा भाषणाचा व्हीडिओ ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या ट्विटरवर ठेवला आहे. त्यावरून भाजप नेते आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांनी प्रियंका गांधी आणि राऊत यांच्यावर टीका केली. यावेळी त्यांची जीभ घसरली. त्यांनी प्रियंका गांधी यांना, पंतप्रधान साहेबांचे भाषण कळलं नाही. बौद्धिक पात्रता नाही ते असा पलवार करतात. तेच पंतप्रधान यांच्या भाषणाचे असे उत्तर देऊ शकतात असे महटलं आहे. तर राऊत यांचा राणे यांनी कार्ट असा उल्लेख केला आहे.