निकालाचा पत्ताच नाही! मात्र काँग्रेसमध्ये वाद आणि रस्सीखेच सुरु? काय आहे नेमकं कारण?
मतदानानंतर कर्नाटक निवडणुकीच्या निकालाचे एक्झिट पोल समोर आले. त्यानुसार काँग्रेस हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरण्याची चिन्हं आहेत. काँग्रेससाठी हा मोठा दिलासा आहे. पण असं असताना काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरु असून पक्षातील वाद उफाळून बाहेर येत असल्याचे दिसत आहे.
बंगळुरु : कर्नाटक विधानसभा निवडणुकांचा निकाल हा काही तासांतच जाहीर होणार आहे. कर्नाटकात आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकात गेल्या काही दिवसांमध्ये राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलेला बघायला मिळाला. त्यानंतर 10 मेला मतदान पार पडलं. मतदानानंतर कर्नाटक निवडणुकीच्या निकालाचे एक्झिट पोल समोर आले. त्यानुसार काँग्रेस हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरण्याची चिन्हं आहेत. काँग्रेससाठी हा मोठा दिलासा आहे. पण असं असताना काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरु असून पक्षातील वाद उफाळून बाहेर येत असल्याचे दिसत आहे. यावरून काँग्रेस राष्ट्रीय प्रवक्ता गौरव वल्लभ यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. कर्नाटकात उद्या काँग्रेस पूर्ण बहुमताने जिंकणार आहे. उद्याच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांमध्ये बैठका सुरू आहेत. मुख्यमंत्री पदावरून काँग्रेसमध्ये वाद नाहीय. कर्नाटकातील कानडी जनता काँग्रेससोबत असणार आहे, अशी प्रतिक्रिया गौरव वल्लभ यांनी दिली.