‘लोटसच्या पाकळ्याच गळून पडल्या आणि हे देशभर…’; राऊत यांनी भाजपसह मोदी-शाह यांना डिवचलं
त्यांनी देशभरात हे भाजपवाले ऑपरेशन करत फिरतात. मात्र जिथे लोटस होतं तिथल्याच पाकळ्या गळून पडल्या. हे तुम्हाला वाचवता आलं नाही. कर्नाटकच्या जनतेने अत्यंत शहाणपणाने घेतलेला हा निर्णय होता.
मुंबई : कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणूका नुकत्याचं पार पडल्या. यात कर्नाटकी जनतेनं काँग्रेसला स्पष्ट बहुमत दिलं. तर भाजपला नाकारलं. यावरून देशपातळीवरून तर राज्यातील विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह आणि भाजपवर जोरदार टीका केली. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपसह मोदी आणि शाह यांच्यावर निशाना साधत टीका केली. त्यांनी देशभरात हे भाजपवाले ऑपरेशन करत फिरतात. मात्र जिथे लोटस होतं तिथल्याच पाकळ्या गळून पडल्या. हे तुम्हाला वाचवता आलं नाही. कर्नाटकच्या जनतेने अत्यंत शहाणपणाने घेतलेला हा निर्णय होता. भारतीय जनता पक्षाने पंतप्रधान मोदींपासून ते गृहमंत्री शाहांपर्यंत संपूर्ण यंत्रना लावली. पण त्यांना 70 जागा देखिल मिळवता आल्या नाहीत. तर ज्या काँग्रेसला तुम्ही कचरा, पप्पू, हे, ते, म्हणत हिणवत होते त्या काँग्रेसच्या गळ्यामध्ये कर्नाटकच्या जनतेने विजयी माला घातली. देशाला एक संदेश दिला असेही राऊत यांनी म्हटलं आहे.