Karnataka Elections : एक्झिट पोलचा कौल कोणाच्या बाजूने? भाजप, काँग्रेस की जेडीएस, कोण मारणार मैदान?
कर्नाटकात भाजप आणि काँग्रेस याच्याबरोबर जीडीएसकडून चांगल्याच पद्धतीने प्रचार झालेला आहे. तर त्याच पद्धतीने 73.19% इतकं बंपर मतदान झालेलं आहे. त्यामुळे बंपर झालेल्या मतदानाचा कुणाला फायदा होणार तर कोणाला फटका बसणार हे पाहणं विशेष ठरेल.
मुंबई : कर्नाटक विधानसभेसाठी (Karnataka Assembly Elections) मतदान पार पडलेलं आहे. आता निकालाची उत्सुकता कर्नाटकसह महाराष्ट्रातील नेत्यांना लागली आहे. आज कर्नाटकच्या मतदारांचा फौसला येणार असून ईव्हीएममधील (EVM) बंद झालेलं भाजप, काँग्रेस की जेडीएस भवितव्य बाहेर येणार आहे. निकालातून कर्नाटकात कोण बाजी मारणार? तर कोण किंगमेकर ठरणार हे समोर येईलच. मात्र याच्या आधी एक्झिट पोलचा कौल कोणाच्या बाजूने आहे हे ही पाहणे महत्वाचं ठरणार आहे. कर्नाटकात भाजप आणि काँग्रेस याच्याबरोबर जीडीएसकडून चांगल्याच पद्धतीने प्रचार झालेला आहे. तर त्याच पद्धतीने 73.19% इतकं बंपर मतदान झालेलं आहे. त्यामुळे बंपर झालेल्या मतदानाचा कुणाला फायदा होणार तर कोणाला फटका बसणार हे पाहणं विशेष ठरेल. तर कर्नाटकच्या 224 जागांसाठी मतदान झालं होतं. 113 हा बहुमताचा आकडा आहे. तो बहुमताचा आकडा कोण गाठणार हे आता पहावं लागणार आहे. मात्र सध्या एक्झिटपोलचे निकाल (Exit Poll Results) काही औरच सांगत आहेत. यामध्ये भाजपला काँग्रेस पिच्छाडिवर सोडताना दिसत आहे. तर जीडीएस ही किंगमेकरच्या भूमिकेमध्ये सध्या तरी दिसत आहे. पहा कर्नाटकात एक्झिटपोल काय म्हणतो. कोण बाजी मारणार यावर हा स्पेशल रिपोर्ट