कर्नाटक निवडणूक : स्टार प्रचारकांची भाजपची यादी प्रसिद्ध, महाराष्ट्रातून कोण?
भाजपकडून कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, जेपी नड्डा, राजनाथ सिंह आणि अमित शहा यांच्यासह 40 नेत्यांच्या नावांचा समावेश आहे
मुंबई : कर्नाटक विधानसभेसाठी येत्या 10 मे रोजी मतदान होणार आहे. तर 13 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. मात्र यादरम्यान तिकिट न मिळाल्याने भाजपमधील अनेक मात्तबार नेते नाराज झाले आहे. यापैकी अनेकांनी काँग्रेसची वाट धरली आहे. तर काहींनी भाजपवर नाराजी व्यक्त करत थेट राजकारणातून संन्यास घेतला आहे. त्यातच होणारे डॅमेज थांबविण्यासह प्रचारावर भाजपने लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यासाठी भाजपकडून कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, जेपी नड्डा, राजनाथ सिंह आणि अमित शहा यांच्यासह 40 नेत्यांच्या नावांचा समावेश आहे. जे कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा प्रचार करणार आहेत. यादरम्यान राज्यातून कोण जाणार याकडे राज्यातील भाजप नेत्यांचे लक्ष लागून राहीलं होतं. ते आता स्पष्ट झालं आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जाणार आहेत.