'पोपटाने आत्महत्या करावी, असेच 'हे' बोलतील'; सीमा वादावरून भाजप नेत्यानं मविआला सुनावले खडे बोल

‘पोपटाने आत्महत्या करावी, असेच ‘हे’ बोलतील’; सीमा वादावरून भाजप नेत्यानं मविआला सुनावले खडे बोल

| Updated on: May 20, 2023 | 12:14 PM

तर या शपथविधीसाठी महाविकास आघाडीचे नेते देखील जाणार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेत्यांपैकी या शपथविधीसाठी उपस्थित असतील. त्यावरून भाजपने मविआच्या नेत्यांवर टीका केली आहे.

नागपूर : कर्नाटकचे नवनियुक्त मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांचा 20 मे रोजी बेंगळुरू येथे शपथ होणार आहे. याला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी हेमंत सोरेन, सीताराम येचुरी, फारुख अब्दुल्ला, अखिलेश यादव आणि नवीन पटनायक यांसारख्या समविचारी विरोधी नेते उपस्थित राहणार आहेत. तर या शपथविधीसाठी महाविकास आघाडीचे नेते देखील जाणार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेत्यांपैकी या शपथविधीसाठी उपस्थित असतील. त्यावरून भाजपने मविआच्या नेत्यांवर टीका केली आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी टीका करताना, शपथविधीसाठी गेलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कर्नाटक सीमाप्रश्न सोडवून परत यावं असा टोला लगावला आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीचे नेते फक्त शपथविधीसाठी कर्नाटकात गेले नाही, तर महाराष्ट्रातील 765 गावं कर्नाटकात आहे. ते गावं वापस मागण्यासाठी ते गेली आहेत. ते आजंच ही गावं परत घेण्याचा आदेश घेऊन येतील बघाच असं म्हटलं आहे. आता कर्नाटकात काग्रेस सरकार आलंय. त्यामुळे हे नेते सीमा प्रश्नावर बोलणार नाही. यांचा खरा चेहरा समोर येईल. हे नेते पुढील पाच वर्ष कर्नाटक सीमा प्रश्नावर बोलणार नाहीत. उलट पोपटाने आत्महत्या करावी असे वाक्य हे नेते बोलणार.

Published on: May 20, 2023 12:14 PM