भाजपनंच, फौजदावरुन हवालदार केला, अजून काय लायकी काढायची शिल्लक; राष्ट्रवादी नेत्याचा फडणवीसांवर पलटवार
इथं राष्ट्रवादी काँग्रेसचा देखील उमेदवार आहे. कर्नाटकात येऊन काय डोंबलं करणार? हे पार्सल महाराष्ट्रात पाठवून द्या, त्याचं काय करायचे बघतो, अशा शब्दांमध्ये फडणीस यांनी हल्लाबोल केला.
मुंबई : कर्नाटक निवडणूक प्रचाराचा (Karnataka Election Campaign) धुरळा शांत झाला आहे. आज मतदानाला सुरूवात झाली आहे. पण तेथे केलेल्या प्रचारातील टीकेचा धूर मात्र राज्यात निघत आहे. निपाणीमध्ये प्रचार करताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादीला साडे 3 जिल्ह्यांचा पक्ष म्हटलं. इतकचं काय तर, इथं राष्ट्रवादी काँग्रेसचा देखील उमेदवार आहे. कर्नाटकात येऊन काय डोंबलं करणार? हे पार्सल महाराष्ट्रात पाठवून द्या, त्याचं काय करायचे बघतो, अशा शब्दांमध्ये फडणीस यांनी हल्लाबोल केला. त्यावर याच्याआधीच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपनंच, फडणवीसांना फौजदारावरुन हवालदार केल्याची टीका केली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या रूपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombare) यांनी देखिल टीका केली आहे. त्यांनी, फडणवीस यांच्या या टीकेला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हवालदार केलं असं उत्तर दिलं. अजून काय लायकी काढायची शिल्लक आहे असा सवाल केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते म्हणून काम केला आहात? आता उपमुख्यमंत्री आहात, सरकार म्हणून कामं करायची सोडून कशाला उचापती करत आहात? फडणवीस तुमचं राज्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे. तुम्ही अपयशी ठरत आहात. यापदाच्या लायकीचे नाही आहात. सातत्याने बरगळणे हा धंदा त्यांनी बंद करावा नाहीतर जनताच त्याचं राजकारण बंद करेल.