आले… पण मुख्यमंत्री म्हणून नाही; काँग्रेस नेत्याचा फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका
फडणवीस यांनी तालुक्यातील निट्टूर येथील प्रसिद्ध नृसिंह मंदिरास भेट देत उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तेव्हा त्यांनी मी पुन्हा येईन म्हटलं की येतोच. मी कसा येतो हे तुम्हाला देखील माहित आहे. आपलं कुलदैवत नरसिंह आपण कुठूनही प्रगती करतो असं वक्तव्य केलं.
नागपूर : कर्नाटक निवडणुकांच्या प्रचारासाठी गेलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या मी पुन्हा येईन या वाक्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ते बेळगावातील प्रचार आटोपून अचाक सिमाभागात असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात गेले. यावेळी फडणवीस यांनी तालुक्यातील निट्टूर येथील प्रसिद्ध नृसिंह मंदिरास भेट देत उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तेव्हा त्यांनी मी पुन्हा येईन म्हटलं की येतोच. मी कसा येतो हे तुम्हाला देखील माहित आहे. आपलं कुलदैवत नरसिंह आपण कुठूनही प्रगती करतो असं वक्तव्य केलं. तर काँग्रेसवर टीका करताना आता काँग्रेस काही सत्तेवर येत नाही असा टोला लगावला होता. त्याला आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी, ते राज्याचे मुख्यमंत्री होते. पण मी पुन्हा येईन म्हणत आले आणि काय झाले. त्यामुळे ते काय बोलतात हे कळायला कारण नाही. काँग्रेस सत्तेतच येणार नाही असेही ते काल बोलले. मात्र भाजप आता सत्तेत येईल की नाही हे त्यांनी आधी पहावं असा टोला लगावला आहे. तर पुन्हा आले म्हणून ते मुख्यमंत्री झाले नाहीत तर उपमुख्यमंत्री झाले. माझ्यासारखा असता तर असं खालच्या पदावर आलाच नसता अशी घणाघाती टीका पटोले यांनी फडणवीस यांच्यावर केली आहे.