शिंदे-फडणवीस कर्नाटकात, शरद पवार सातारा-सोलापूरात! प्रचाराचासह दौऱ्यांची रणधुमाळी सुरू?
त्यानंतर अजित पवार हे अक्टिव्ह होत पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. तर आता शरद पवार यांनीही कार्यालय आणि घर सोडत दौऱ्यावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. राजीनामा मागे घेताच ते आता आज आणि उद्या ते दौऱ्यावर आहेत. आज त्यांचा सोलापूर आणि उद्या सातारा दौरा असणार आहे.
मुंबई : कर्नाटकात सध्या प्रचाराचांरा नारळ फुटत आहे. अनेक ठिकाणी भाजप विरूद्ध काँग्रेस अशीच लढत होणार असं बोललं जात आहे. याचदरम्यान राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजीनामा दिला आणि राज्यासह देशात एकच खळबळ उडाली. यामुळे राज्यातील सत्तासमिकरणं बदलण्याची चिन्ह होती. मात्र होणारी उलतापालथ थांबली आणि पवार यांनी राजीनामा मागं घेतला. त्यानंतर अजित पवार हे अक्टिव्ह होत पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. तर आता शरद पवार यांनीही कार्यालय आणि घर सोडत दौऱ्यावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. राजीनामा मागे घेताच ते आता आज आणि उद्या ते दौऱ्यावर आहेत. आज त्यांचा सोलापूर आणि उद्या सातारा दौरा असणार आहे. तर बेळगाव आणि आसपासच्या मराठी भाषिक मतदारांना आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रचारासाठी जाणार आहेत. ते भाजप उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. तर देवेंद्र फडणवीस हे कर्नाटकमध्येच आहेत. ते येथील निपाणीमध्ये भाजप उमेदवाराचा प्रचार करणार आहेत.