कर्नाटक निवडणूक अन् विजयाचे पाच मंत्र; काँग्रेसची 5 वचने कोणती? आश्वासन काँग्रेस पाळणार?
यादरम्यान राहुल गांधी यांच्या त्या प्रतिक्रियेची आठवण आली आणि त्यांनी दिलेली ती आश्वासने पुर्ण होणार का आता असा सवाल केला जात आहे. त्याचदरम्यान कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत पक्षाच्या पाच हमीपत्रांची पूर्तता करण्याचे तत्वत: मान्यता दिली आहे.
बंगळुरू : कर्नाटकातील निवडणुकीच्या प्रचारावेळी भाजप आणि काँग्रेसने त्यांची आश्वासनं आणि वचने ही लोकांच्या समोर ठेवली होती. तसेच जोरदार प्रचारही केला होता. त्या रणसंग्रामात राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसने मोठा विजय मिळवला. त्यानंतर काल (20 मे) तेथील सरकारचा शपथविधी देखील पार पडला. यादरम्यान राहुल गांधी यांच्या त्या प्रतिक्रियेची आठवण आली आणि त्यांनी दिलेली ती आश्वासने पुर्ण होणार का आता असा सवाल केला जात आहे. त्याचदरम्यान कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत पक्षाच्या पाच हमीपत्रांची पूर्तता करण्याचे तत्वत: मान्यता दिली आहे. त्यामुळं आता गृहलक्ष्मी, युवानिधी, अन्न भाग्य, गृह ज्योती, सखी योजना सारख्या योजनांचा लाभ कर्नाटक जनतेला मिळणार आहेत. यात सर्व घरांना 200 युनिट मोफत वीज (गृह ज्योती), प्रत्येक घरातील महिला प्रमुखाला (गृहलक्ष्मी) 2,000 रुपये मासिक मदत, दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) कुटुंबातील प्रत्येक सदस्याला 10 किलो मोफत अन्न (अण्णा) यांचा समावेश आहे. भाग्य) तांदूळ, बेरोजगार पदवीधर तरुणांसाठी दरमहा रु. 3,000 आणि बेरोजगार पदविकाधारकांना (दोन्ही 18-25 वयोगटातील) (युवा निधी) दोन वर्षांसाठी रु. 1,500 आणि सार्वजनिक वाहतूक बसमध्ये महिलांसाठी मोफत प्रवास (शक्ती) असणार आहे. त्यावरच हा स्पेशल रिपोर्ट