भाजपने नाकारलेल्या उमेदवाराचा मोठा विजय!, जी. जनार्दन रेड्डी कोण?

भाजपने नाकारलेल्या उमेदवाराचा मोठा विजय!, जी. जनार्दन रेड्डी कोण?

| Updated on: May 13, 2023 | 1:29 PM

याचदरम्यान भाजपने ज्यांनी नाकारलं असे उमेदवार ही विजयी झाल्याने भाजपने स्वत:च्याच पायावर दगड मारून घेतल्याचा प्रकार झाला आहे.

मुंबई : कर्नाटकात विजयाचा संदेश देण्यासाठी देशभरातील प्रदेश काँग्रेस कार्यालयांमध्ये जल्लोषाची तयारी सुरू आहे. कलांमध्ये काँग्रेसला बहुमत मिळाले आहे. काँग्रेस कार्यकर्ते आणि समर्थक पक्ष कार्यालयाबाहेर जल्लोष करत आहेत. मात्र भाजपमध्ये सध्या शांतता पसरली आहे. याचदरम्यान भाजपने ज्यांनी नाकारलं असे उमेदवार ही विजयी झाल्याने भाजपने स्वत:च्याच पायावर दगड मारून घेतल्याचा प्रकार झाला आहे. भाजपचे माजी दिग्गज नेते जनार्दन रेड्डी यांना बेकायदेशीर खाण प्रकरणात तुरुंगात जावं लागलं होतं. त्यामुळे भाजपने त्यांचा पत्ता कट केला होता. यावर नाराजी व्यक्त करत त्यांनी आपण रिंगणात असणार असल्याचे सांगत स्वत:चा पक्ष स्थापन केला. आणि राज्य प्रगती पक्षाच्या तिकिटावर कोप्पल जिल्ह्यातील गंगावती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ते जिंकले सुद्धा. जी जनार्दन रेड्डी यांची भाजपचे विद्यमान आमदार पराना ईश्वरप्पा मुनावल्ली आणि काँग्रेसचे इक्बाल अन्सारी यांच्याशी थेट लढत झाली. जनता दल (एस)नेही एचआर चन्नकेशव यांना त्यांच्यासमोर उभे केले होते.

Published on: May 13, 2023 01:29 PM