कर्नाटकात आयकर विभागाची कारवाई, भाजप आमदाराकडे काळ धन; सापडली कोट्यावधींची माया

कर्नाटकात आयकर विभागाची कारवाई, भाजप आमदाराकडे काळ धन; सापडली कोट्यावधींची माया

| Updated on: Apr 20, 2023 | 11:49 AM

कर्नाटकातील रामदुर्गचे भाजप उमेदवार चिक्करेवन्ना यांच्याशी संबंधित गाडीत 1 कोटी 54 लाखांची रोकड मिळून आली आहे. ही रोकड पोलिसांनी केली जप्त केली असून चिक्करेवन्ना यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

कोल्हापूर : निवडणुका जवळ आल्या की, राजकीय पक्षांकडून मोठी तयारी सुरु होते. सध्या कर्नाटकच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहेत. मात्र त्याचे पडसाद हे सीमा भागामध्ये पहायला मिळत आहेत. तर कर्नाटकात सत्तेत असणाऱ्या भाजप पक्षाच्याच उमेदवाराकडे मोठी रक्कम सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. कर्नाटकातील रामदुर्गचे भाजप उमेदवार चिक्करेवन्ना यांच्याशी संबंधित गाडीत 1 कोटी 54 लाखांची रोकड मिळून आली आहे. ही रोकड पोलिसांनी केली जप्त केली असून चिक्करेवन्ना यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर आयकर विभागाने कारवाई सुरु केली आहे. तर हा काळा पैसा आहे का? याचा शोध आयकर विभाग घेत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर रोकड सत्ताधारी आमदाराकडे सापडल्याने खळबळ उडली आहे.

Published on: Apr 20, 2023 11:49 AM