हिजाब वादातील याचिका कोर्टाने फेटाळली ; Imtiyaz Jaleel म्हणतात, ‘कोर्टाचा निर्णय दुर्देवी’
हिजाब प्रकरणावर (Karnatak Hijab) आज कर्नाटक उच्च न्यायालयाने (Karnataka High Court) ऐतिहासिक निकाल दिला आहे. हिजाब हा धर्माचा अविभाज्य भाग नाही. हिजाब घालणं इस्लाममध्ये बंधनकारक नाही, असं सांगतानाच शाळेत हिजाब परिधान करायचा की नाही हा सर्वस्वी शाळा (school) प्रशासनाचा अधिकार आहे.
हिजाब प्रकरणावर (Karnatak Hijab) आज कर्नाटक उच्च न्यायालयाने (Karnataka High Court) ऐतिहासिक निकाल दिला आहे. हिजाब हा धर्माचा अविभाज्य भाग नाही. हिजाब घालणं इस्लाममध्ये बंधनकारक नाही, असं सांगतानाच शाळेत हिजाब परिधान करायचा की नाही हा सर्वस्वी शाळा (school) प्रशासनाचा अधिकार आहे. तेच निर्णय घेतील, असा ऐतिहासिक निर्णय कर्नाटक हायकोर्टाने दिला आहे. तसेच या संदर्भातील सर्व याचिकाही कर्नाटक कोर्टाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे कर्नाटकमधल्या शाळेतील हिजाब बंदीवर कोर्टाकडूनही शिक्कामोर्तब झालं आहे. उडूपीच्या मुलींनी कोर्टात याचिका दाखल करून शाळेत हिजाब परिधान करण्यास परवानगी देण्याची मागणी केली होती. कोर्टाने ही याचिका फेटाळून लावताना विद्यार्थी शालेय गणवेश परिधान करून येण्यास नकार देऊ शकत नाहीत, असं कोर्टाने निकाल देताना म्हटलं आहे.
Published on: Mar 15, 2022 04:09 PM
Latest Videos