कर्नाटकचं राजकीय तापमान वाढणार? प्रचारात आज दिग्गज स्टेजवर? आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीच फैरी

कर्नाटकचं राजकीय तापमान वाढणार? प्रचारात आज दिग्गज स्टेजवर? आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीच फैरी

| Updated on: May 06, 2023 | 10:39 AM

या निवडणुकीत सर्वाधिक जागांवर आपले उमेदवार निवडून यावे, यासाठी भाजपने कंबर कसली आहे. तर भाजपला कडवा विरोध करण्याचे काम काँग्रेसकडून होत आहे.

मुंबई : कर्नाटकात सध्या विधानसभा निवडणुकीच्या (Karnataka Assembly Election) पार्श्वभीमवर प्रचंड राजकीय घडामोडी घडत आहेत. कर्नाटकात विधानसभेच्या 224 जागांसाठी येत्या 10 मे रोजी निवडणूक पार पडणार आहे. तर 13 मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीत सर्वाधिक जागांवर आपले उमेदवार निवडून यावे, यासाठी भाजपने कंबर कसली आहे. तर भाजपला कडवा विरोध करण्याचे काम काँग्रेसकडून होत आहे. याच पार्श्वभूमिवर कर्नाटकात अनेक प्रचारसंभांचे आयोजन केलं जात आहे. आजही कर्नाटक प्रचाराता फिव्हर पहायाला मिळणार आहे. येथे आज दिग्गज नेत्यांच्या प्रचार सभा होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बंगळूरूमध्ये रोड शो होणार आहे. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या बेळगावमध्ये चार जाहीर सभा आहेत. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची हुबळीत तर राहुल गांधी यांच्या बेळगाव जिल्ह्यामध्ये तीन प्रचार सभा आज होणार आहे. त्यामुळे आज कर्नाटकचे राजकीय तापमान वाढणारं आहे.

Published on: May 06, 2023 10:39 AM