मुख्यमंत्री यांच्या ‘रोड शो’ ला पवार देणार सभेनं उत्तर; कोणती भूमिका घेणार याची उत्सुकता
राज्यातील अनेक नेते हे महाराष्ट्र-कर्नाटक सिमाभागात आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील कर्नाटकात भाजपचा प्रचारात उतरले आहेत.
मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने अनेक नेते कर्नाटकच्या रणधुमाळीत शब्दांचा गुलाल उधाळणार आहेत. राज्यातील अनेक नेते हे महाराष्ट्र-कर्नाटक सिमाभागात आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील कर्नाटकात भाजपचा प्रचारात उतरले आहेत. ते भाजपच्या दोन रोड शोमध्ये सहभागी होणार आहेत. कापू आणि उडुपी शहरात हे रोड शो होणार आहेत. यानंतर ते धर्मस्थळ मंदिराचे धर्माधिकारी वीरेंद्र हेगडे यांची भेट घेणार आहेत. तेसच उडुपी येथील श्रीकृष्ण मंदिरालाही भेट देतील. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी सोमवारी निपाणीत आहेत. स्थानिक काँग्रेसने राष्ट्रवादीच्या या उमेदवारीबद्दल याच्याआधीच आक्षेप घेतला होता. यामुळेच पवार हे निपाणीत कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.