कर्नाटक विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचाही शड्डू

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचाही शड्डू

| Updated on: Apr 01, 2023 | 9:29 AM

कर्नाटक विधानसभेच्या बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीने शड्डू ठोकला आहे. तर येथील सहा जागा समिती लढवणार असल्याचा बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.

बेळगाव : कर्नाटक विधानसभा निवडणुकीची अखेर घोषणा करण्यात आली आहे. कर्नाटकात एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. कर्नाटकात 10 मे रोजी मतदान होणार आहे. तर 13 मे रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. यावेळी भाजपची थेट काँग्रेसशी लढत होणार असल्याचे सध्याची स्थिती कर्नाटकात आहे. याचदरम्यान बेळगावमधून मराठी मतदारांसाठी खास बातमी आहे. कर्नाटक विधानसभेच्या बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीने शड्डू ठोकला आहे. तर येथील सहा जागा समिती लढवणार असल्याचा बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे बेळगावसह सिमाभागात सध्या मराठी मानसात उत्साह पहायला मिळत आहे.

Published on: Apr 01, 2023 09:28 AM