कर्नाटक विजयाने मविआत उत्साह! महाराष्ट्रात कोणत्या समिकरणांची नांदी
या निवडणुकीत भाजपचा काँग्रेसकडून दारुण पराभव झाला. त्यामुळे अख्या देशात काँग्रेसध्ये चैतन्य दिसत आहे. अशातच महाराष्ट्रातही आता भाजप विरोधी वारे वाहायला सुरूवात झाल्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेत.
मुंबई : संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. 2024 लोकसभा निवडणुकीआधी होणारी ही निवडणूक भाजप (BJP) आणि काँग्रेससाठी (Congress) रंगीत तालीम आहे. पण या निवडणुकीत भाजपचा काँग्रेसकडून दारुण पराभव झाला. त्यामुळे अख्या देशात काँग्रेसध्ये चैतन्य दिसत आहे. अशातच महाराष्ट्रातही आता भाजप विरोधी वारे वाहायला सुरूवात झाल्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेत. तर आपण महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढलो तर भाजपचा पराभव करणे काही अवघड काम नाही असेही पवार यांनी म्हटलं आहे. तर राज्यात येणारी निवडणूक ही मविआ म्हणूनच लढू असेही आता मविआच्या नेत्यांमधून शुर उमटत आहे. तर यामुळे काँग्रेसचे सहयोगी मित्र पक्षांकडून राज्यात जल्लोष केला जात असून भाजपवर सडकून टीका केली जात आहे. त्यावरून आता येथे भाजप, शिंदे गटाविरोद्ध मविआ असं वाकयुद्ध रंगले आहे. त्यावर हा स्पेशल रिपोर्ट