Video | देवेंद्र फडणवीस यांची वारकऱ्यांसोबत फुगडी, अमृता यांचा भजनाच्या सुरात सूर, पहा पंढरीतला सोहळा

Video | देवेंद्र फडणवीस यांची वारकऱ्यांसोबत फुगडी, अमृता यांचा भजनाच्या सुरात सूर, पहा पंढरीतला सोहळा

| Updated on: Nov 04, 2022 | 9:48 AM

देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपुरातील नामदेव वाड्यात दर्शन घेतलं. वारकऱ्यांसोबत फुगडी खेळली. तसेच गायिका म्हणून लोकप्रिय असेलल्या अमृता फडणवीस यांनी वारीतील भजनात सूर मिसळला.

पंढरपूरः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस (Devendra Fadanvis) यांनी आज पंढरपुरात कार्तिकी एकादशीनिमित्त (Kartitki Ekadashi) विठ्ठल- रुक्मिणीची (Vitthal Rukmini) महापूजा केली. यावेळी पत्नी अमृता फडणवीस यादेखील उपस्थित होत्या. शुक्रवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास देवेंद्र फडणवीस पती पत्नी, तसेच मानाचे वारकरी उत्तमराव साळुंखे यांच्यासमवेत विठ्ठलाची पूजा करण्यात आली. त्यानंतर भाविकांसाठी विठ्ठल दर्शन खुले करण्यात आले. त्यानंतर फडणवीस यांनी पंढरपुरातील नामदेव वाड्यात दर्शन घेतलं. वारकऱ्यांसोबत फुगडी खेळली. तसेच गायिका म्हणून लोकप्रिय असेलल्या अमृता फडणवीस यांनी वारीतील भजनात सूर मिसळला.

Published on: Nov 04, 2022 09:48 AM