Karuna Sharma अंबाबाई मंदिराचं दर्शन घेऊन उमेदवारी अर्ज भरणार

Karuna Sharma अंबाबाई मंदिराचं दर्शन घेऊन उमेदवारी अर्ज भरणार

| Updated on: Mar 24, 2022 | 1:43 PM

करुणा शर्मा (Karuna Sharma) आणि धनंजय मुंडे (Dhanjanya Munde) यांची प्रेमकहाणी (Love Story) लवकरच मराठीत येणार आहे. त्यावर काम सुरू आहे.

करुणा शर्मा (Karuna Sharma) आणि धनंजय मुंडे (Dhanjanya Munde) यांची प्रेमकहाणी (Love Story) लवकरच मराठीत येणार आहे. त्यावर काम सुरू आहे. धनंजय मुंडे यांनी स्वतःची सहा मुले आणि अनेक बायका लपवल्या आहेत, असा हल्लाबोल करुणा शर्मा यांनी कोल्हापूरमध्ये बोलताना केला. करुणा शर्मा यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत उतरणार असल्याची घोषणा केलीय. करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेऊन त्या आज उमेदवारी अर्ज भरणार आहे. देवीच्या आशीर्वादाने आपल्याला विजय मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. जनतेचा आवाज म्हणून विधानसभेत जाण्याची इच्छा आहे. आपण महिला सुरक्षा आणि सक्षमीकरणावर काम करणार आहोत. कोल्हापुरातील घराणेशाहीच्या राजकारणामुळे इथला विकास थांबला आहे. त्यामुळे इथली घराणेशाही आपण संपवू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, करुणा शर्मा यांच्या या आरोपाला धनंजय मुंडे काय उत्तर देणार याची उत्सुकता साऱ्यांनाचा आहे.

Published on: Mar 24, 2022 01:43 PM