Karuna Sharma : ‘मुलं मुंडेंची पण बायको नाही, असं कसं..’, मुंडेंच्या वकिलांकडून झालेल्या युक्तिवादावर करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया

Karuna Sharma : ‘मुलं मुंडेंची पण बायको नाही, असं कसं..’, मुंडेंच्या वकिलांकडून झालेल्या युक्तिवादावर करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया

Updated on: Mar 29, 2025 | 5:42 PM

मुंडेंनी करुणा शर्मांना दर महिन्याला २ लाखांची पोटगी देण्याच्या वांद्रे सत्र न्यायालयाच्या अंतरिम आदेशावरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आज अंतिम सुनावणी झाली. करुणा शर्मांना पोटगी देण्याच्या वांद्रे सत्र न्यायालयाच्या अंतरिम आदेशाला धनंजय मुंडेंनी माझगाव सत्र न्यायालयात आव्हान दिले होते.

राष्ट्रवादीचे माजी मंत्री धनंजय मुंडेंना करुणा शर्मांना दर महिन्याला २ लाखांची पोटगी देण्याचे आदेश वांद्रे सत्र न्यायालयाकडून देण्यात आले होते. मात्र न्यायालयाच्या या अंतरिम आदेशाविरोधात करूणा शर्मा यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज अंतिम सुनावणी पार पडली. आता न्यायालयाकडून यासंदर्भात पुढील तारीख देण्यात आली आहे. यानंतर करूणा शर्मा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘आज झालेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने करूणा शर्मा यांना काही पुरावे सादर करण्याचे आदेश दिले आहे. हे पुरावे येत्या ५ तारखेला सादर करणार आहे.’, अशी माहिती करूणा शर्मांनी दिली. तर झालेल्या युक्तिवादात न्यायालयाने दुसऱ्या याचिकाकर्त्यांना (करुणा शर्मा) त्यांना मूल आहेत. मग ही मूलं कोणाची आहेत, अशी विचारणा केली. मग करुणा आई आहे की नाही. मग ह्यांचे वडील कोण? असे प्रश्न न्यायालयाने धनंजय मुंडेंच्या वकिलांना केल्याचे पाहायला मिळाले. धनंजय मुंडे यांनी केलेल्या युक्तिवादावर बोलताना त्या असेही म्हणाल्या की, मुले धनंजय मुंडे यांची आहेत तर मग पत्नी नाही, असं कसं होऊ शकतं? या संदर्भातील सगळे पुरावे न्यायालयात सादर करणार असल्याचे करूणा शर्मा यांनी म्हटले.

Published on: Mar 29, 2025 02:55 PM
Karuna Sharma : ‘लग्न झालंच नाही तर…’, करूणा शर्मांच्या पोटगीसंदर्भातील याचिकेवर मुंडेंच्या वकिलांचा युक्तिवाद काय?
Anjali Damania : ‘… तर धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द होणार’, करूणा शर्मांच्या वक्तव्यानंतर दमानियांचं मोठं वक्तव्य