राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी; अर्ज भरण्यासाठी आज शेवटचा दिवस

राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी; अर्ज भरण्यासाठी आज शेवटचा दिवस

| Updated on: Mar 27, 2023 | 11:17 AM

राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस

कोल्हापूर : कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीवरून जिल्ह्यातील पारंपारिक विरोधक माजी आमदार महादेवराव महाडिक व काँग्रेस आमदार सतेज पाटील एकमेकांच्या समोर ठाठले आहेत. राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्याने कोल्हापूरात उत्सहाचे वातावरण पहायला मिळत आहे. राजारामच्या प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या निवडणुकीत आमदार पाटील यांच्या नेतृत्‍वाखालील गटाचे अर्ज शक्तिप्रदर्शनाने भरण्यात येणार आहेत. यासाठी कार्यकर्त्यांना सकाळी दहा वाजता सासने मैदानावर बोलवले आहे. स्वतः आमदार पाटील या वेळी उपस्थित रहाणार आहेत. तर सत्ताधारी गटाचे उर्वरीत अर्ज देखील आज भरण्यात येणार आहेत. त्यामुळे राजाराम कोणाकडे जाणार याकडे संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Published on: Mar 27, 2023 11:17 AM