कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपची जोरदार तयारी; काँग्रेस प्रचाराचा नारळ कधी फोडणार?

कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपची जोरदार तयारी; काँग्रेस प्रचाराचा नारळ कधी फोडणार?

| Updated on: Feb 09, 2023 | 9:21 AM

पुण्यातील कसबा मतदारसंघात पोटनिवडणूक होतेय. या निवडणुकीच्या प्रचाराची जोरदार तयारी सुरु आहे. पाहा व्हीडिओ...

पुणे : पुण्यातील कसबा मतदारसंघात पोटनिवडणूक होतेय. या निवडणुकीच्या प्रचाराची जोरदार तयारी सुरु आहे. भाजपने प्रचारासाठी विशेष तयारी केलीय. या निवडणुकीसाठी भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. भाजपचे बडे नेते हेमंत रासने यांच्या प्रचाराला येणार आहेत. भाजपचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार प्रचारासाठी पुण्यात असणार आहेत. तर काँग्रेसच्या प्रचारालाही आजपासून सुरुवात होणार आहे. तांबडी जोगेश्वरी मंदिरात नारळ वाढवून प्रचार सुरु केला जाणार आहे. कसब्याचे काँग्रेसचे निरीक्षक संग्राम थोपटेंच्या नेतृत्वात प्रचाराला सुरुवात होणार आहे. महाविकास आघाडीचे पदाधिकारी होणार प्रचार पदयात्रेत सहभागी होणार आहेत.

Published on: Feb 09, 2023 09:14 AM