कसबा पोटनिवडणुकीत भाजपकडून 'या' नावावर शिक्कामोर्तब; सूत्रांची माहिती

कसबा पोटनिवडणुकीत भाजपकडून ‘या’ नावावर शिक्कामोर्तब; सूत्रांची माहिती

| Updated on: Feb 04, 2023 | 11:28 AM

कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणूकीबाबत भाजपच्या गोटातून महत्वाची अपडेट आहे. 'या' नेत्याला संधी मिळणार असल्याची माहिती आहे. पाहा...

पुणे : कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणूकीबाबत भाजपच्या गोटातून महत्वाची अपडेट आहे. कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी हेमंत रासने यांचं नाव आघाडीवर आहे. गेली 30 वर्ष सामाजिक-राजकीय जीवनात काम करत आहे. श्रीमंत दगडूशेठ गणपती मंडळाच्या माध्यमातून माझं काम सुरू आहे. आतापर्यंत पक्षाने जी जबाबदारी दिली ती मी पार पाडली आहे. त्यामुळे मला संधी मिळाल्यास आनंद होईल. दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांपैकी देखील कोणालाही उमेदवारी मिळण्याची शक्यता पक्षावर अवलंबून आहे, असं हेमंत रासने म्हणालेत.

Published on: Feb 04, 2023 11:24 AM