कसबा मतदारसंघातून गिरीश बापट निवडून येण्याचे ‘राज’ रवींद्र धंगेकर यांनी उलगडले
कसबा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे गिरीश बापट सातत्याने निवडून येत आहेत. ही जागा नेहमी भाजप का जिंकते याचे रहस्य कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी सांगितले आहे.
पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे गिरीश बापट सातत्याने निवडून येत आहेत. लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर ही जागा मुक्ता टिळक यांनी जिंकली. ही जागा नेहमी भाजप का जिंकते याचे रहस्य कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी सांगितले आहे. ज्या दिवशी उमेदवारी अर्ज भरला त्यादिवशीच माझा विजय निश्चित झाला. जनता माझ्यासोबत आहेच पण आता शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि कॉंग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र आहेत. गिरीश बापट नेहमी बेरजेच्या राजकारणात जिंकत होते. पण आताची परिस्थिती वेगळी आहे. आता आम्ही सगळे एक आहोत. भाजपला पराजय दिसू लागला की हिंदुत्वाचा मुद्दा दिसतो. राष्ट्रवादीच्या सभेतील काही मुद्दा उकरण्याचा प्रयत्न भाजपने केला. पण, हार दिसते तेव्हा अशी कारणे काढली जातात अशी टीकाही त्यांनी केली.
Published on: Feb 24, 2023 11:08 AM
Latest Videos