“अहंकारापोटी पक्ष फुटीची काहाणी ऐकण्यासाठी…”, उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवर भाजप नेत्याची टीका
ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची एक मुलाखत 26 आणि 27 जुलै या दोन दिवशी प्रसारित होणार आहे. या मुलाखतीत उद्धव ठाकरे मोठा गौप्यस्फोट करण्याची शक्यता आहे. त्याचा टिझर रिलिज झाला आहे. या मुलाखतीवर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी टीका केली आहे.
मुंबई, 25 जुलै 2023 | ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची एक मुलाखत 26 आणि 27 जुलै या दोन दिवशी प्रसारित होणार आहे. या मुलाखतीत उद्धव ठाकरे मोठा गौप्यस्फोट करण्याची शक्यता आहे. त्याचा टिझर रिलिज झाला आहे. यामध्ये उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उल्लेख खेकडा असा केला आहे. तसंच उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला या देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावरही भाष्य करणार असल्याचं टिझरमध्ये दिसत आहे. या मुलाखतीवर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी टीका केली आहे. मित्र पक्षाला कसा धोका दिला ऐकण्यासाठी लोक उत्सुक आहेत. मुख्यमंत्री असताना घरी बसल्याची कहाणी ऐकण्यासाठी लोक उत्सुक आहेत. इतंकच नाही तर अहंकारापोटी पक्ष फुटल्याची कहाणी ऐकण्यासाठी लोक उत्सुक आहेत, अशा शब्दांमध्ये केशव उपाध्ये यांनी टीका केली आहे.
Published on: Jul 25, 2023 01:49 PM
Latest Videos