जयंत पाटील यांना भाजपची ऑफर? भाजप नेता राऊत यांच्यावर संतापला, म्हणाला, “सामनाची अवस्था म्हणजे…”
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपची ऑफर फेटाळल्याने ईडीने कारवाई केल्याची टीका संजय राऊत यांनी केली. सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपची ऑफर फेटाळल्याने ईडीने कारवाई केल्याची टीका संजय राऊत यांनी केली. सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. यावर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केशव उपाध्ये यांनी संजय राऊत यांचे आरोप फेटाळले आहेत. “भाकरी एकाची आणि चाकरी दुसऱ्याची हा संजय राऊत यांचा फॉर्म्युला आहे. कधीकाळी हिंदुत्वाचा ज्वलंत पुरस्कार करणारी सामनाची अवस्था आता फेक न्यूज फॅक्टरीसारखी करून ठेवली आहे. जयंत पाटील यांना कोणताही प्रस्ताव भाजपने दिलेला नाही”, असं सांगित केशव उपाध्ये यांनी संजय राऊत यांचे आरोप फेटाळले.
Latest Videos