Video : 'हीला चोपल्यानंतर मनाला शांती मिळेल' रुपाली पाटील यांनी केतकीचे संस्कारच काढले!

Video : ‘हीला चोपल्यानंतर मनाला शांती मिळेल’ रुपाली पाटील यांनी केतकीचे संस्कारच काढले!

| Updated on: May 14, 2022 | 12:39 PM

शरद पवार यांच्यावर केलेल्या वादग्रस्त पोस्टमुळे रुपाली पाटील यांनी केतकी चितळेवर टीका केली. शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह भाषेत फेसबुक पोस्ट केल्यावर सध्या वाद रंगलाय.

पुणे : राष्ट्रवादी नेत्या रुपाली पाटील यांनी केतकी चितळे हीच्या फेसबुक पोस्टवर संताप व्यक्त केलाय. मी तिला चोप देणार आहे, असं विधान त्यांनी केलं आहे. आमच्या साहेबांबाबत तिनं बोललंच नाही पाहिजे, असंही ते म्हटलं पाहिजे. केतकीविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. यावेळी टीव्ही 9 चे पुणे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्यासोबत बोलताना रुपाली पाटील यांनी तिखट शब्दांत केतकी चितळेला सुनावलंय. तिच्या आईवडिलांनी केलेले संस्कार कमी पडले असल्याचं म्हणत रुपाली पाटील यांनी टीका केली आहे. तिच्या जन्मावरुनही रुपाली पाटील यांनी निशाणा साधलाय. शरद पवार यांच्यावर केलेल्या वादग्रस्त पोस्टमुळे रुपाली पाटील यांनी केतकी चितळेवर टीका केली. शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह भाषेत फेसबुक पोस्ट केल्यावर सध्या वाद रंगलाय. सोशल मीडियातून केतकीच्या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया देत निशाणा साधलाय.

Published on: May 14, 2022 12:39 PM