विहीरी आटल्या! घसा कोरडा, टँकरच्या भरवशावर पुरं गाव; कुठं यंदाही भीषण पाणी टंचाई?
उष्णता वाढल्याने पाण्याची भीषण टंचाई अनेक भागात पहायला मिळत आहे. तर घोटभर पाण्यासाठी माात भगीनींना राणोवनी भटकावं लागतं आहे. असंच काहीसं चित्र येथील मेळघाटातील खडीमल गावातही पहायला मिळत आहे. गावात यंदाही भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
अमरावती : राज्यात अनेक ठिकाणी उष्णतेचा लाटेचा कहर पहायला मिळत आहे. उष्णता वाढल्याने पाण्याची भीषण टंचाई अनेक भागात पहायला मिळत आहे. तर घोटभर पाण्यासाठी माात भगीनींना राणोवनी भटकावं लागतं आहे. असंच काहीसं चित्र येथील मेळघाटातील खडीमल गावातही पहायला मिळत आहे. गावात यंदाही भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे महिलांना पण्यासाठी पाणवट्याचा आधार घ्याला लागत आहे. तेथेही तांब्यानं पाणी भरावं लागत आहे. यामुळे सध्या गावात टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. हे पाणी थेट आटलेल्या विहीरीत सोडले जात आहे. त्यामुळे घशाची कोरड काही अंशी भागताना दिसत आहे. सध्या येथे 4 टँकरद्वारे पुरवठा करण्यात आला आहे.
Published on: Jun 04, 2023 10:26 AM
Latest Videos