Uday Samant | खडसे आणि मी पवारांना एकत्र भेटायला गेलो नव्हतो, खडसे-पवार भेटीवर उदय सामंत LIVE
जळगावातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी बुधवारी मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली. एकनाथ खडसे हे शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर आले होते. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्यावर दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. तेव्हापासून शरद पवार आपल्या निवासस्थानी आराम करत आहे. या काळात अनेक राजकीय पक्षांचे नेते शरद पवार यांना भेटून गेले आहेत. एकनाथ खडसे (Eknath Khadse) बुधवारी सकाळी सिल्व्हर ओकवर आले आणि त्यांनी पवारांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंतही याठिकाणी उपस्थित होते. ही केवळ सदिच्छा भेट असल्याचे एकनाथ खडसे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
Latest Videos