Abdul Sattar | खैरे -दानवे यांनी स्वतःचे कोर्ट उभारावे, आमदार अब्दुल सत्तार यांचा टोला

Abdul Sattar | खैरे -दानवे यांनी स्वतःचे कोर्ट उभारावे, आमदार अब्दुल सत्तार यांचा टोला

| Updated on: Aug 08, 2022 | 5:02 PM

Abdul Sattar | टीईटी परीक्षेतील आरोपांच्या उठलेल्या राळवरुन आमदार अब्दुल सत्तार यांनी खैरे-दानवे यांना टोला हाणला आहे.

Abdul Sattar | टीईटी घोटाळ्यावरुन (TET Scam) आरोपींची राळ उठल्यानंतर शिंदे गटातील (Shinde Group) आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire)आणि आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांना टोला हाणला. आपला मुलगा टीईटी परीक्षेलाच बसला नव्हता. तर दोन्ही मुली टीईटी परीक्षेत अपात्र असल्याचे म्हणणे त्यांनी मांडले. शिक्षण आयुक्तांनी दिलेल्या यादीत त्या अपात्र असल्याचे स्पष्ट होते. टीईटीचा फायदा हा नोकरी मिळवण्यासाठी आणि वेतन मिळवण्यासाठी करण्यात येतो, असे सांगत, आपल्या मुलांनी जर वेतन उचलले असेल, पगार मिळवला असेल तर शिक्षणाधिकाऱ्यांकडे याविषयीचा रेकॉर्ड उपलब्ध असेल, तिथे जाऊन तपास करु शकता, असे त्यांनी सांगितले. हे आपल्याविरोधात षडयंत्र करण्यात आले आहे. आपल्या मुलींचे नाव पात्रता यादीत कसे आले याचा तपास व्हावा अशी मागणी त्यांनी केली.

Published on: Aug 08, 2022 05:02 PM