अमृतपाल सिंग मोठी अपडेट, अमृतपाल सिंगला मोगा येथील गुरुद्वारातून पोलिसांनी घेतलं ताब्यात
याच्या आधी पत्नी किरणदीप कौर हिला दोन दिवसांपूर्वी पंजाब पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. ती लंडन पळून जात होती त्यावेळी पोलिसांनी तिला अमृतसर विमानतळावरून ताब्यात घेतले होतं
मुंबई : खलिस्तानी नेता आणि वारिस पंजाब दे चा प्रमुख अमृतपाल सिंग यांच्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमृतपालला पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. अमृतपाल सिंग याला मोगा येथील गुरुद्वारातून ताब्यात घेण्यात आले आहे. पंजाब पोलिसांनी अमृतपाल सिंगच्या अटकेला दुजोरा दिला आहे. तर अमृतपाल सिंग याने पंजाह पोलिसांकडे आत्मसमर्पण केलं आहे. याच्या आधी पत्नी किरणदीप कौर हिला दोन दिवसांपूर्वी पंजाब पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. ती लंडन पळून जात होती त्यावेळी पोलिसांनी तिला अमृतसर विमानतळावरून ताब्यात घेतले होतं. मात्र चौकशीनंतर तिला सोडून देण्यात आलं होतं. यानंतरच आता अमृतपालच्या अटकेची माहिती समोर आली आहे. याआधी 15 एप्रिलला पंजाब पोलिसांनी त्याचा जवळचा सहकारी जोगा सिंगला फतेहगढ साहिब जिल्ह्यातील सरहिंद येथून अटक केली होती. आणखी एक जवळचा मित्र, पप्पलप्रीत सिंग याला 10 एप्रिल रोजी पंजाब पोलिस आणि त्याच्या काउंटर इंटेलिजन्स युनिटने केलेल्या कारवाईत अटक करण्यात आली.