Bhandara Khamari Village | भंडाऱ्यातील खमारी गावाला पुराचा वेढा, 4 हजार नागरिक अडकले गावात
भंडाऱ्यातील खमारी गावाला(Khamari village) पुराने वेढा घातला आहे. चारही बाजूने पाण्याने वेढल्याने गावाला बेटाच स्वरूप आलं आहे. भंडारा तालुक्यांतील खमारी गावात एखाद्याची प्रकृति बिघडली तर त्याला रूग्णालयात नेण्यासाठी कुठलाही रस्ता उरला नाही. तर गावातून बाहेर आलेले नागरीक बाहेरच अडकून पडले आहेत.
भंडारा : भंडारा गोंदिया जिल्ह्यात दोन दिवस पावसाने दमदार हजेरी लावली आहे. भंडाऱ्यात(Bhandara ) पावसाने धुमाकूळ(heavy rain) घातला आहे. या पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. भंडाऱ्यातील खमारी गावाला(Khamari village) पुराने वेढा घातला आहे. चारही बाजूने पाण्याने वेढल्याने गावाला बेटाच स्वरूप आलं आहे. भंडारा तालुक्यांतील खमारी गावात एखाद्याची प्रकृति बिघडली तर त्याला रूग्णालयात नेण्यासाठी कुठलाही रस्ता उरला नाही. तर गावातून बाहेर आलेले नागरीक बाहेरच अडकून पडले आहेत. त्यांचा संपुर्ण कुटुंब खमारी गावात असून त्यांना जाता येतं नाही. तर प्रशासनाकडून कुठलीच मदत मिळाली नाही. पुरामुळे येथील नागरीकांची मोठी अडचण झाली आहे. येथील ग्रामस्थ प्रशासनाच्या मदतीच्या प्रतिक्षेत आहेत.
Published on: Aug 16, 2022 08:58 PM
Latest Videos