तक्रारीवरून राऊत भडकले, म्हणाले, सरकारविरोधात गुन्हा दाखव करा

तक्रारीवरून राऊत भडकले, म्हणाले, सरकारविरोधात गुन्हा दाखव करा

| Updated on: Apr 21, 2023 | 11:54 AM

शिंदे गटाने त्यांच्याविरोधात मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यावरून प्रश्न विचारले असता, त्यांनी शिंदे गटाला धारेवर धरले. तसेच शिंदे गट आता भाजप झाला आहे. ते सारखी तक्रार करतात

मुंबई : खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने 12 लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. तसेच या दुर्घटनेत 50 लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला. यावरून शिंदे गटाने त्यांच्याविरोधात मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यावरून प्रश्न विचारले असता, त्यांनी शिंदे गटाला धारेवर धरले. तसेच शिंदे गट आता भाजप झाला आहे. ते सारखी तक्रार करतात. तक्रार केली असेल तर करू द्या हे बीजेपीचे माणस आहेत, तक्रार करतात. त्यात नवीन काय? खारघरमध्ये जे मृत्यू झाले त्याला जबाबदार कोण? हिंमत असेल तर मुख्यमंत्री, गृहमंत्री, सांस्कृतिक मंत्री, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा. मनात जरा जरी मानवता असेल सरकारविरोधात गुन्हा दाखल करा. आहे का हिंमत अशी विचारणा केली आहे.

Published on: Apr 21, 2023 11:54 AM