राज ठाकरे हे भाजपचे पोपट, त्यांची ही पोपटबाजी महाराष्ट्र आणि देश सगळा बघतोय; राऊत यांची सडकून टीका
त्यांची ही पोपटबाजी महाराष्ट्र आणि देश सगळं बघतोय, राज ठाकरे हे आता विश्वाचे नेते झालेत, ट्रम्पवर गुन्हा का दाखल केला, असंही ते उद्या म्हणतील, असे म्हणत त्यांनी ठाकरे यांची खिल्ली उडवली आहे.
मुंबई : खारघर येथील महाराष्ट्र भूषण सोहळ्यात घडलेल्या दुर्घटनेप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारची बाजू घेतली होती. तर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ही चुकीची असल्याचे म्हटलं होतं. त्यावरून खासदर संजय राऊत यांनी जहरी टीका केली आहे. त्यांनी राज ठाकरे हे पोपट आहेत. भाजपनं विकत घेतलेले हे लोक आहेत,’ असं म्हटलं आहे. त्यांची ही पोपटबाजी महाराष्ट्र आणि देश सगळं बघतोय, राज ठाकरे हे आता विश्वाचे नेते झालेत, ट्रम्पवर गुन्हा का दाखल केला, असंही ते उद्या म्हणतील, असे म्हणत त्यांनी ठाकरे यांची खिल्ली उडवली आहे. त्याचबरोबर ‘कोरोना काळातील मृत्यूंसाठी गुन्हे दाखल करायचे तर ते देशभरात केले पाहिजेत. उत्तर प्रदेशात गंगेत हजारो प्रेतं वाहून जात होती, गुजरातमध्ये स्मशानात प्रेतांच्या रांगा लागल्या होत्या त्याचीही चौकशी व्हायला पाहिजे. मग गुजरात आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी राज ठाकरे यांनी करायला हवी असेही ते म्हणाले