जशाच तसं भाजप उत्तर देणार; प्रवक्ते, मीडिया प्रतिनिधींची बैठक
आता महाविकास आघाडीसोबतच ठाकरे यांच्या टीकेली उत्तर देण्यासह महाविजय 2024 साठी महत्त्वपूर्ण बैठक मुंबईत भाजप घेत आहे
मुंबई : खेड, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर आणि आता ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. ठाण्यातील प्रकरणानंतर ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर एक अत्यंत फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभला आहे. अत्यंत लाचार आणि लाळघोटे करणारा उपमुख्यमंत्री पद मिळालं म्हणून नुसती फडणवीसी करणारा एक माणूस गृहमंत्री म्हणून मिरवतो आहे अशी जहरी टीका केली होती. त्यांच्या या टीकेनंतर आता भाजप आणि ठाकरे गट आमने सामने आला आहे. तर आता महाविकास आघाडीसोबतच ठाकरे यांच्या टीकेली उत्तर देण्यासह महाविजय 2024 साठी महत्त्वपूर्ण बैठक मुंबईत भाजप घेत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित ही बैठक होणार असून यात भाजप प्रवक्ते, मीडिया प्रतिनिधी सहभागी होणार आहे. या बैठकीमध्ये पुढची रणनीती ठरवली जाणार आहे. तर मविआच्या टीकांना जशाच तसं उत्तर दिलं जाणार आहे.