24 वर्षात केलेली घाण साफ करायला वेळ लागणार ना?, शिवसेनेचा आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल

“24 वर्षात केलेली घाण साफ करायला वेळ लागणार ना?”, शिवसेनेचा आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल

| Updated on: Jun 26, 2023 | 9:25 AM

पहिल्याच पावसात मुंबई तुंबल्यामुळे ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र डागलं. याला प्रत्युत्तर म्हणून शिवसेना नेते किरण पावसकर यांनी 24 वर्षात केलेली घाण साफ करायला वेळ लागणार ना? असा टोला लगावला आहे.

मुंबई : पहिल्याच पावसात मुंबई तुंबल्यामुळे ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र डागलं. याला प्रत्युत्तर म्हणून शिवसेना नेते किरण पावसकर यांनी 24 वर्षात केलेली घाण साफ करायला वेळ लागणार ना? असा टोला लगावला आहे. ते म्हणाले की, “मुख्यमंत्री यांनी सर्व सामान्य लोकांच्या दृष्टीने स्वागत केलं, मात्र त्याचा विपर्यास करत टीका होतेय. लोकं उकड्याने हैराण होते ते पावसामुळे सुखवले त्याच स्वागत करायला नको का?24 वर्षात महापालिकेत जी घाण केली ती सफाई करायला वेळ लागेल ना? दिवस-रात्र भ्रष्टाचार, भ्रष्टाचार बोलायचं.आदित्य ठाकरे यांचं बालपण या भ्रष्टाचाराच्या पैशातूनच झालेत.”

 

Published on: Jun 26, 2023 09:25 AM