‘लाडकी सून योजना’ सुरु करा, किरण वळसे-पाटील यांचा घरचा आहेर
...लाडकी बहीण योजना' सध्या महाराष्ट्रात खूपच गाजत आहे. या योजनेत निराधार महिलांच्या खात्यावर 1500 रुपये दर महिन्याला मिळणार आहेत. या योजनेचा लाभ पदरात पाडण्यासाठी लाडका भाऊ आपल्या केव्हा प्रसन्न होतो आणि खात्यात कधी एकदा पहिला हप्ता पडतो याकडे महाराष्ट्रातील महिलांचे लक्ष लागले आहे. यातच एका मंत्र्याच्या पत्नीनेच लाडकी सून योजनेची मागमी केली आहे.
मध्य प्रदेश येथील लाडली बहेना ही योजना प्रचंड यशस्वी ठरल्याने राज्य सरकारने आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना आणली आहे. या योजनेची सध्या महाराष्ट्रात सर्वत्र नोंदणी सुरु झाली आहे. या योजनेत गरजू महिलांच्या खात्यावर दरमहिन्याला 1500 रुपये जमा होणार आहेत. या योजनेचे स्वागत होत आहे. तसेच प्रत्येक गावातील सर्वच पक्षाचे कार्यकर्ते या योजनेचे फॉर्म जास्तीत जास्त भरुन घेत आहेत.त्यामुळे विरोधी पक्ष आधी योजनेवर टिका करीत होते.या योजनेसाठी पैसा कोठून आणणार आणि आता योजनेसोबत गावात स्वत:चे मोठे होर्डिंग लावत असल्याची टिका नुकतीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात भाजपा कार्यकर्त्यांच्या चिंतन शिबिरात केली होती. आता राज्य सरकारचे मंत्री आणि शरद पवार यांचे याचे एकेकाळचे जणू मानसपूत्र दिलीप वळसे-पाटील यांच्या पत्नी किरण यांनी एका कार्यक्रमात सरकारने लाडकी सून योजना सुरु केल्यास अख्ख्या जगातील महिलांचा पाठींबा मिळेल. कारण प्रत्येक मुलगी कधीतरी कोणाची सून होतेच.. सूनेचे दुख केवळ तिलाच ठाऊक असते. त्यामुळे ‘लाडकी सून योजना’ गरजेची असल्याचेही किरण वळसे पाटील यांनी म्हटले आहे.