किरीट सोमय्या यांचा हल्लाबोल, उद्धव ठाकरे यांना कायमचे...

किरीट सोमय्या यांचा हल्लाबोल, उद्धव ठाकरे यांना कायमचे…

| Updated on: Jan 31, 2023 | 9:14 AM

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मंत्री अनिल परब यांनी बांद्रा पूर्व येथील म्हाडाची जमीन बळकावली होती. या जमिनीवर हजार स्वेअर फुटांचे अनधिकृत कार्यालय बांधले होते.

मुंबई : तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( uddhav thackeray ) यांचे मंत्री अनिल परब ( anil parab ) यांनी बांद्रा पूर्व येथील म्हाडाची जमीन बळकावली होती. या जमिनीवर हजार स्वेअर फुटांचे अनधिकृत कार्यालय बांधले होते. लोकायुक्त यांनी ते काढण्याचे आदेश दिले होते. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना सरंक्षण दिले होते. ते कार्यालय आता पाडले असून ते पहायला मी उद्या जाणार आहे.

दुसरे राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांचा बुरखा आता उच्च न्यायालयात फाटला आहे. मुखमंत्री पद गेल्यामुळे उद्धव ठाकरे यांना आता मातोश्रीवर आराम करण्याची संधी मिळाली आहे. ती बरीच वर्ष कायम राहील. आता विधानसभा, लोकसभा, महापालिका कुठलीही निवडणूक घ्या. आता त्यांना कायमचे घरीच बसावे लागणार आहे, असा टोला भाजप नेते किरीट सोमय्या यांनी लगावला आहे.

Published on: Jan 31, 2023 09:14 AM