Kirit Somaiya | 'Mansukh Hirenनंतर माझ्या हत्येचा ठाकरे सरकारचा कट'

Kirit Somaiya | ‘Mansukh Hirenनंतर माझ्या हत्येचा ठाकरे सरकारचा कट’

| Updated on: Feb 07, 2022 | 5:13 PM

मनसुख हिरेननंतर आता किरीट सोमैया (Kirit Somaiya) यांची हत्या करण्याचा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारचा प्लॅन आहे. पुणे (Pune) घटनेच्या व्हडिओ क्लिप बाहेर आल्या, तरी पुणे पोलीस शांत असल्याची टीका भाजपा नेते किरीट सोमैया यांनी केली आहे.

मनसुख हिरेननंतर आता किरीट सोमैया (Kirit Somaiya) यांची हत्या करण्याचा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारचा प्लॅन आहे. पुणे (Pune) घटनेच्या व्हडिओ क्लिप बाहेर आल्या. दगड, लाठी, काठी ज्या पद्धतीने हल्ला झाला तरी पुणे पोलीस शांत असल्याची टीका भाजपा नेते किरीट सोमैया यांनी केली आहे. संजय राऊत, उद्धव ठाकरे, अनिल परब, पाटणकर यांचे घोटाळे बाहेर येत आहेत. म्हणूनच किरीट सोमैयांना गप्प बसवायचे आहे. मी मोदी सरकारच्या सुरक्षा रक्षकांना भेटणार आहे. मी राज्यपालांना भेटणार आहे. तसेच गुरुवारी केंद्रीय गृह मंत्रालयाला रिपोर्ट देणार आणि ठाकरे सरकारचे घोटाळे काढूनच गप्प बसणार, असे यावेळी सोमैया म्हणाले. भाजपाचे नेते किरीट सोमैयांवर 5 तारखेला पुणे महापालिकेत हल्ला करण्यात आला होता. त्यावरून सोमैयांनी शिवसेनेला धारेवर धरले आहे.