Kirit Somaiya यांचा हा दिलासा घोटाळाच आहे- Sanjay Raut यांचा न्यायव्यवस्थेवर गंभीर आरोप
भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांना उच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी त्यावर सवाल केले आहेत. गेल्या काही काळापासून भाजपच्या लोकांना दिलासा मिळत आहे. दिशा सालियन, मुंबई बॉम्ब प्रकरण ते विक्रांत घोटाळा (ins vikrant) करणाऱ्या आरोपींपर्यंत एका रांगेत सर्वांना दिलासे कसे मिळतात? न्यायव्यवस्थेवर कुणाचा दबाव आहे?
भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांना उच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी त्यावर सवाल केले आहेत. गेल्या काही काळापासून भाजपच्या लोकांना दिलासा मिळत आहे. दिशा सालियन, मुंबई बॉम्ब प्रकरण ते विक्रांत घोटाळा (ins vikrant) करणाऱ्या आरोपींपर्यंत एका रांगेत सर्वांना दिलासे कसे मिळतात? न्यायव्यवस्थेवर कुणाचा दबाव आहे? न्याय व्यवस्थेत विशेष असे लोकं दिलासा देण्यासाठी बसवले आहेत का? ते कुणाच्या सूचनेने काम करत आहेत का? असा सवाल करतानाच विशिष्ठ राजकीय पक्षाच्या, विशिष्ठ विचारसरणीच्या लोकांनाच न्याय मिळावा यासाठी न्याय यंत्रणा काम करतात. हे असंच सुरू राहिलं तर देशाचं स्वातंत्र्य, लोकशाही आणि न्यायव्यवस्था धोक्यात येईल, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
Published on: Apr 15, 2022 11:42 AM
Latest Videos