३९ हजार ५३ शेतकऱ्यांच्या नावाने केलेल्या गोंधळाची चौकशी होणारच; सोमय्या यांचा हल्ला
जिल्हा मध्यवर्ती बँकेने अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्या सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना व गडहिंग्लज साखर कारखाना चालवण्यास घेतलेल्या ब्रिक्स कंपनी आणि मित्र परिवार यांना दिलेल्या कर्जाबाबत चौकशी करण्यात येणार आहे
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना व गडहिंग्लज साखर कारखाना चालवण्यास घेतलेल्या ब्रिक्स कंपनीला दिलेल्या कर्जपुरवठ्यावरून जिल्हा बँकेचे चाचणी लेखापरीक्षण होणार आहे. याबाबतचे आदेश विभागीय सहनिबंधक अरुण काकडे यांनी दिले आहेत. त्यानंतर भाजपचे माजी खासदार किरिट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली. जिल्हा मध्यवर्ती बँकेने अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्या सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना व गडहिंग्लज साखर कारखाना चालवण्यास घेतलेल्या ब्रिक्स कंपनी आणि मित्र परिवार यांना दिलेल्या कर्जाबाबत चौकशी करण्यात येणार आहे. तसेच ३९ हजार ५३ शेतकऱ्यांच्या नावाने केलेल्या गोंधळाचाही स्पेशल ऑडिट होणार असल्याचा म्हटलं आहे.
Published on: Mar 09, 2023 12:11 PM
Latest Videos