वाऱ्यावर सोडलं नाही म्हणता, मग… शेतकऱ्यांच्या मृत्यूवर राऊतांनी मुख्यमंत्र्यांना घेरलं
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या की नाही हे माहित नाही. पण काल दुर्दैवाने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. चर्चा करण्यासाठी जे दोन मंत्री नेमले ते फुसके मंत्री निघाले
मुंबई : गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेलं शेतकऱ्यांचं आंदोलन अखेर मागे घेतल्याची घोषणा शेतकऱ्यांचे नेते जीवा पांडू गावीत यांनी केली. तसेच राज्य सरकारने 70 टक्के मागण्या मान्य केल्याचेही त्यांनी सांगितलं. तर याच मुद्दावर उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे.
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या की नाही हे माहित नाही. पण काल दुर्दैवाने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. चर्चा करण्यासाठी जे दोन मंत्री नेमले ते फुसके मंत्री निघाले. मुख्यमंत्री महोदय शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं नाही म्हणतात पण त्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं. त्यामुळेच एका शेतकऱ्याचा मृत्यू झालाय. त्याचा प्रायचित्त मुख्यमंत्र्यांनी केलं पाहिजे.
Published on: Mar 18, 2023 12:02 PM
Latest Videos