“सर्वांचे काका चांगले होते, पण कोणाला भाऊ नडतोय तर…” शिंदे गटाच्या आमदराचं मोठं वक्तव्य
महाराष्ट्रात काका-पुतण्याचं राजकारण खूप गाजलं आहे आणि गाजतयं.बाळासाहेब ठाकरे आणि राज-उद्धव ठाकरे तसेच शरद पवार आणि अजित पवार अशी अनेक उदाहरणं आपल्या महाराष्ट्रात मिळतील. त्याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी विधान केलं आहे.
जळगाव, 20 जुलै 2023 | महाराष्ट्रात काका-पुतण्याचं राजकारण खूप गाजलं आहे आणि गाजतयं.बाळासाहेब ठाकरे आणि राज-उद्धव ठाकरे तसेच शरद पवार आणि अजित पवार अशी अनेक उदाहरणं आपल्या महाराष्ट्रात मिळतील. त्याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी विधान केलं आहे. ते म्हणाले की, “सर्वांचे काका चांगले होते पण कोणाला भाऊ नडतोय तर कुणाला बहीण नडतेय अजितदादांना बहीण नडली, धनंजय मुंडे यांना बहीण नडली आणि राज ठाकरेंना भाऊ नडतोय. सर्व काकांनी पुतण्यांवर विश्वास ठेवला सर्वांना पुढे नेलं त्यांचं कर्तुत्व पाहून न्याय दिला.गोपीनाथ मुंडेंनी धनंजय मुंडे यांना पारखून पुढे केलं आज ते दुसऱ्यांदा मंत्री झाले.बाळासाहेब ठाकरे यांनी राज ठाकरेंना पुढे केलं परंतु त्यांनाही भाऊ नडला.माझे काका आर. ओ. पाटील यांनी पोलीस खात्याचा राजीनामा द्यायला लावून मला राजकारणात आणलं आता मला माझी बहीण नडते.”