बेजबाबदार नागरिकांमुळं कडक निर्बंध लावणं गरजेचं : किशोरी पेडणेकर

| Updated on: Apr 02, 2021 | 3:00 PM

बेजबाबदार नागरिकांमुळं कडक निर्बंध लावणं गरजेचं असल्याचं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

मुंबई: मुंबईत कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत असल्याने मुंबईत पुन्हा एकदा कठोर निर्बंध लागण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये मुंबईत ज्या पद्धतीने निर्बंध लावण्यात आले होते, तसेच निर्बंध आताही लागण्याची शक्यता आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी याबाबत मोठं विधान केलं आहे.