भाजपने काळजावर दगड ठेवला.. तिकडे विचारल्याशिवाय निर्णय होत नाही, किशोरी पेडणकरांची प्रतिक्रिया काय?

भाजपने काळजावर दगड ठेवला.. तिकडे विचारल्याशिवाय निर्णय होत नाही, किशोरी पेडणकरांची प्रतिक्रिया काय?

| Updated on: Oct 17, 2022 | 4:10 PM

मनसेचे राज ठाकरेंचं पत्र, देशातले मोठे नेते शरद पवारांनीही तेच सांगितलं. त्यानंतर भाजपाला काळजावर दगड ठेवून हा निर्णय घ्यावा लागला, असं वक्तव्य किशोरी पेडणेकर यांनी केलंय.

मुंबईः अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीतून भाजपचे उमेदवार मुरजी पटेल (Murji Patel) यांनी अर्ज मागे घेतला आहे. स्व. रमेश लटके (Ramesh Latke) यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांची येथे बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे. मात्र भाजपने हा निर्णय सहजा सहजी घेतला नाही, अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी दिली. त्या म्हणाल्या, ‘ उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून ऋतुजा लटके यांची उमेदवारी नक्की केली. त्यानंतर सव्वा महिना महाराष्ट्रात राजकीय घमासान पहायला मिळालं. कोर्टाने महापालिकेचं तोंड आपटवलं. त्यानंतर मनसेचे राज ठाकरेंचं पत्र, देशातले मोठे नेते शरद पवारांनीही तेच सांगितलं. त्यानंतर भाजपाला काळजावर दगड ठेवून हा निर्णय घ्यावा लागला, तरीही जी संवेदनशीलता दाखवली, त्यासाठी आशिष शेलार, देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांचे आभार मानते.

 

Published on: Oct 17, 2022 04:10 PM