वांद्र्यातील ठाकरे गटाच्या शाखेवर बुलडोझर, किशोरी पेडणेकर म्हणतात, हे सूडाचं राजकारण!

वांद्र्यातील ठाकरे गटाच्या शाखेवर बुलडोझर, किशोरी पेडणेकर म्हणतात, “हे सूडाचं राजकारण!”

| Updated on: Jun 22, 2023 | 4:59 PM

मुंबईतील वांद्रे भागातील ठाकरे गटाच्या 40 वर्ष जु्न्या शाखेवर आज मुंबई महापालिकेने कारवाई केली आहे. ही शाखा अनिधिकृत असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. ठाकरे गटाच्या ऑटो चालक वेल्फेअरच्या कार्यालयावर ही कारवाई करण्यात आली आहे. सत्ताधारी विनाकारण ठाकरे गटाला त्रास देण्यासाठी ही कारवाई करत आहेत, असा आरोप वॉर्ड क्रमांक 96 जे माजी नगरसेवक हाजी हलीम खान यांनी केला आहे. त्यामुळे या कारवाईवरून राजकारण तापले आहे.

मुंबई : मुंबईतील वांद्रे भागातील ठाकरे गटाच्या 40 वर्ष जु्न्या शाखेवर आज मुंबई महापालिकेने कारवाई केली आहे. ही शाखा अनिधिकृत असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. ठाकरे गटाच्या ऑटो चालक वेल्फेअरच्या कार्यालयावर ही कारवाई करण्यात आली आहे. सत्ताधारी विनाकारण ठाकरे गटाला त्रास देण्यासाठी ही कारवाई करत आहेत, असा आरोप वॉर्ड क्रमांक 96 जे माजी नगरसेवक हाजी हलीम खान यांनी केला आहे. त्यामुळे या कारवाईवरून राजकारण तापले आहे.या संबंधित घटनेवर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “हे सूडाचं राजकारण सुरु आहे. मुंबईकर आणि महाराष्ट्रातली जनता हे बघत आहे. शिवसैनिकांचं हे मंदिर आहे. भले आज ते उद्धव ठाकरे यांच्याकडे असतील, पण शिंदे गट एकीकडे म्हणतं आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत, आणि दुसरीकडे अशाप्रकारची कारवाई करत आहे. हे सूडाचं राजकारण आहे,” असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

Published on: Jun 22, 2023 04:59 PM