ठाकरे गटाच्या महिला आघाडीत अस्वस्थता? किशोरी पेडणेकर म्हणतात, मनीषा कायंदे यांनी स्क्रिप्ट वाचली

ठाकरे गटाच्या महिला आघाडीत अस्वस्थता? किशोरी पेडणेकर म्हणतात, “मनीषा कायंदे यांनी स्क्रिप्ट वाचली”

| Updated on: Jun 20, 2023 | 8:22 AM

शिवसेनेच्या वर्धापनदिनी काल ठाकरे गटाच्या कार्यक्रमात माजी महापौर किशोरी पेडणेकर यादेखील उपस्थित होत्या. आमदार मनीषा कायंदे यांच्या बंडानंतर किशोरी पेडणेकर या देखील शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. दरम्यान किशोरी पेडणेकर यांनी वर्धापनदिनावरून मनीषा कायंदे आणि शिंदेंच्या शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे.

मुंबई : शिवसेनेच्या वर्धापनदिनी काल ठाकरे गटाच्या कार्यक्रमात माजी महापौर किशोरी पेडणेकर यादेखील उपस्थित होत्या. आमदार मनीषा कायंदे यांच्या बंडानंतर किशोरी पेडणेकर या देखील शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. दरम्यान किशोरी पेडणेकर यांनी वर्धापनदिनावरून मनीषा कायंदे आणि शिंदेंच्या शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. “शिवसेनेचा जो घडलेला इतिहास आहे तो या षण्मुखानंद हॉलमध्ये दिसतोय”, असं पेडणेकर म्हणाल्या. किशोरी पेडणेकर यांनी मनीषा कायंदे यांना जिथे आहात तिथे सुखी रहा असा सल्ला ही दिला आहे. “दोन वेळा नगरपालिकेल्या पडलेल्या, एकदा आमदारकीला पडलेल्या आमच्याकडे आल्यानंतर घडवलेल्या, मिळवल्यानंतर जात असतील तर त्यांच्याकडे संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय. ठाकरे गटाच्या महिला आघाडीत कोणतीही अस्वस्थता नाही आहे, त्यांना आता तिथे जावून स्क्रिप्ट वाचायची आहे, म्हणून त्या असं काहीतरी बरळत आहेत”, असं पेडणेकर म्हणाल्या.

Published on: Jun 20, 2023 08:22 AM