नीलम गोऱ्हे मलाई खाऊन गेल्या, त्या किरीट सोमय्या यांच्यावर का बोलतील?,  किशोरी पेडणेकर यांचा हल्लाबोल

“नीलम गोऱ्हे मलाई खाऊन गेल्या, त्या किरीट सोमय्या यांच्यावर का बोलतील?”, किशोरी पेडणेकर यांचा हल्लाबोल

| Updated on: Jul 19, 2023 | 9:38 AM

किरीट सोमय्या यांच्या कथित वादग्रस्त व्हिडीओ प्रकरणावरून ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. मंगळवारी सकाळी ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या नेतृत्वात भारतमाता सिनेमागृहाच्या चौकात आंदोलन करण्यात आलं. यावेळी किशोरी पेडणेकर यांनी किरीट सोमय्या यांच्यावर सडकून टीका केली आहे.

मुंबई, 19 जुलै 2023 | भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आतापर्यंत ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यामुळे ठाकरे गटात किरीट सोमय्या यांच्याविरोधात राग आहे. त्यातच सोमवारी सोमय्या यांच्या कथित वादग्रस्त व्हिडीओ प्रकरणावरून शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मंगळवारी सकाळी ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या नेतृत्वात भारतमाता सिनेमागृहाच्या चौकात आंदोलन करण्यात आलं. यावेळी किशोरी पेडणेकर यांनी किरीट सोमय्या यांच्यावर सडकून टीका केली आहे. किशोरी पेडणेकर नेमकं काय म्हणाल्या त्यासाठी हा व्हिडीओ नक्की पाहा…

Published on: Jul 19, 2023 09:38 AM