Kishori Pednekar: राज ठाकरेंना एवढंच सांगेन, जागते रहो, नाही तर निवडणुका आल्यावर…;

Kishori Pednekar: राज ठाकरेंना एवढंच सांगेन, जागते रहो, नाही तर निवडणुका आल्यावर…;

| Updated on: Apr 18, 2022 | 1:31 PM

आमच्या हिंदुत्वाबाबत (hindutva) प्रश्न विचारले जात होते. त्याला प्रश्नांना महाआरती हे उत्तर आहे. जागते रहो, एवढंच राज ठाकरेंना (raj thackeray) सांगेन. त्यांना जाग आली असेल तर चांगलंच आहे. पण आता जागच राहावं.

मुंबई: आमच्या हिंदुत्वाबाबत (hindutva) प्रश्न विचारले जात होते. त्याला प्रश्नांना महाआरती हे उत्तर आहे. जागते रहो, एवढंच राज ठाकरेंना (raj thackeray) सांगेन. त्यांना जाग आली असेल तर चांगलंच आहे. पण आता जागच राहावं. जागते रहो. नाहीतर निवडणुका आल्यावर दोन महिने उठायचं अन् नंतर काहीच नाही, असा टोला शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर (kishori pednekar) यांनी लगावला. त्या मीडियाशी संवाद साधत होत्या. भोंग्याच्या मुद्द्यावरूनही त्यांनी जोरदार टीका केली. ज्या भोंग्यांना परवानग्या आहेत आणि जे प्रदूषण टाळत असतील त्यांना कोर्टानंही परवानगी दिलीय. मात्र, विनापरवाना भोंगे असतील तर परवानगी नाही. ही बाब सर्वच धर्मांना लागू राहील. देशाची फाळणी पुन्हा कुणाला हवीय का? कोणत्याही गटाची मारामारी असो, सामाजिक सलोखा बिघडत असेल तर पोलिसांनी कडक भूमिका घ्यावी, असं आवाहनही किशोरी पेडणेकर यांनी केलं.

Published on: Apr 18, 2022 01:31 PM