'काळाची गरज उद्धव-राज!', मुंबई, पुण्यानंतर कोल्हापुरात झळकले बॅनर्स

‘काळाची गरज उद्धव-राज!’, मुंबई, पुण्यानंतर कोल्हापुरात झळकले बॅनर्स

| Updated on: Jul 12, 2023 | 9:09 AM

राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं अशी भावना अनेक सामान्य कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी तशा आशयाचे बॅनर्स देखील पाहायला मिळाले. आता कोल्हापुरात देखील कार्यकर्त्यांनी असे बॅनर्स लावले आहेत.

कोल्हापूर: राज्यात घडणाऱ्या सत्यानाट्याच्या पार्श्वभूमीवर विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गट भाजपसोबत गेल्यानंतर राज आणि उद्धव ठाकरे बंधूनी एकत्र यावं अशी भावना अनेक सामान्य कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी तशा आशयाचे बॅनर्स देखील पाहायला मिळत आहेत. मुंबई, ठाणे आणि नाशिक पाठोपाठ आता कोल्हापुरात देखील कार्यकर्त्यांनी असे बॅनर्स लावले आहेत. कोल्हापुरातील फुलेवाडी परिसरातल्या महिला कार्यकर्त्यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावेत अशा आशयाचे फलक लावले आहेत. काळाची गरज उद्धव राज असा उल्लेख करत बॅनर्स लावले आहेत. या होर्डिंगची चर्चा आता कोल्हापूर शहरात सुरू झाली आहे.आज राज्याच्या राजकारणातील परिस्थिती भयानक झाली आहे त्याला राज आणि उद्धव ठाकरेच एकत्र येऊन दिशा देऊ शकतील असा विश्वास या महिला कार्यकर्त्यांना वाटतोय.

Published on: Jul 12, 2023 09:09 AM